Home चंद्रपुर जिल्हा विशेष भरधाव पीकअप ने दुचाकीस्वारास उडविले

भरधाव पीकअप ने दुचाकीस्वारास उडविले

1448

दुचाकीस्वार युवक जागेवरच ठार : नेरी नवरगाव मार्गावरील खुंटळा जवळील घटना

नेरी

.         नवरगाव कडून नेरी कडे भरधाव वेगाने जात असलेल्या पीकअप ने विरुद्ध दिशेने जात असलेल्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवक जागेवरच ठार झाला सदर घटना नेरी-नवरगाव मार्गावर (दि 8) दुपारी 3 वाजता दरम्यान घडली.

.         सविस्तर असे की नितीन मेश्राम (32) हे नागभीड तालुक्यातील येनोली येथील रहिवासी असून दि 8 जाने ला त्यांच्या गावी मडई असल्याने चिमूर तालुक्यातील मानेमोहाळी येथील पाहुणे त्यांच्या घरी आले होते कार्यक्रम संपून आज त्यांना दुचाकी क्र एम एच 34 ए के 7662 या सोडून देण्यासाठी नितीन मानेमोहाळी गेला असता परत येत असताना नेरी नवरगाव मार्गावरील खुंटळा जवळ भरधाव पीक अप ने त्यांना जोरदार धडक दिली यात दुचाकी स्वार नितीन यांचा जागीच मृत्यू झाला. सदर पिकअप कापूस घेऊन जाणारी मालवाहक असल्याचे बोलले जात आहे. धडक इतकी जोरदार होती की दुचाकींचा पार्टस इतरत्र पसरलेले दिसत असून 40 फूट दूर नितीनला फेकण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.

.         मात्र पीक अप कुणाचे आहे याचा सुगावा लागला नाही अपघात होताच पिकअप ने घटनास्थळा वरून धूम ठोकली आहे घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक जांभळे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले मुतकाचे पंचनामा करून प्रेत उत्तरनिय तपासणीसाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सदर अज्ञात पीक अप चालकांवर भांदवी 304 अ 297 437 134 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत

error: Content is protected !!