महसूल विभागाने आवळल्या रेती तस्कराच्या मुसक्या

38

रेती सहित ट्रॅकटर पकडून तहसील कार्यालयात जमा 

नेरी

.         अवैद्य रीत्या विना रायल्टी रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडून महसूल विभागाने रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या सदर कारवाही महसूल विभागाच्या तलाठी पथकाने दि 3 जानेवारी ला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान नवतळा येथे केली.

.         सविस्तर माहिती अशी की नवतळा येथील खासगी बांधकामावर रेती टाकली जात असून सदर रेती ही विना रायल्टी ची असल्याची माहिती तलाठी पथकाला मिळाली तसेच रेती तस्कर हे रात्री अपरात्री अंधाराचा फायदा घेऊन रेतीची तस्करी करतात आणि महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकतात त्यामुळे तलाठी पथकाने सापळा रचून शिवनपायली येथील बोरकर यांच्या ट्रॅक्टर ला रेतीसहित रंगेहात विना रायल्टीने पकडले सदर ट्रॅक्टरचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय चिमूर येथे रवाना करण्यात आले असून ट्रॅकटर विना नंबरचे असल्याची माहिती मिळाली आहे या कारवाईत चेपूरवार तलाठी नवतला, तोडासे तलाठी जांभूळघाट, ठाकरे तलाठी नेरी यांनी मोलाची भूमिका बजावून तस्कराच्या मुसक्या आवळल्या सदर ट्रॅकटर वर कश्याप्रकारे कारवाई केली जाईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे