चंद्रपुरातील दारू दुकानासमोर करणार भजन आंदोलन

99

चंद्रपूर 

.     चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी  उठविण्यात आली. जिल्ह्यात नियमबाह्य दारू दुकानांना परवानगी देण्यात आली होती. आधीच्या तुलनेत सध्या दुप्पट दारू दुकानांना परवाना देण्यात आला आहे. मात्र आजही दारू दुकान धारक प्रशासनाने दिलेल्या वेळेचे पालन करीत नाही. त्यामुळे शासनाच्या नियमाची पायदळी करणाऱ्या दारू दुकानासमोर भजन आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी दिला आहे.

.     सध्या शहरात दारू दुकानात राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन बार, देशी दुकान व वाईन शॉपी सुरू करण्याची वेळ सकाळी 11.30 ते  सायंकाळी 11 वाजेपर्यंत आहे. परंतु वाईन बार, बिअर शापी, देशी दारूचे दुकान सकाळी 7 वाजताच उघडतात. सदर दारू दुकान मालक या वेळा पाळत‌ नाही. त्यामुळे हे तात्काळ कुठेतरी थांबायला हवे यासाठी राहुल देवतळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले जर त्यानंतर दारू दुकान मालकांनी वेळेचे नियम पाळले नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वतीने दारू दुकानासमोर भजन आंदोलन करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या निवेदनात राहुल देवतळे यांनी दिला आहे.

.     निवेदन देते वेळेस नयन डोईफोडे, अभय राऊत, राज सिलसिला, शुभम ठाकरे, अनिकेत भोयर आदी उपस्थित होते.