Home विदर्भ मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासाठी मागितलेले 50 दिवस पूर्ण

मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासाठी मागितलेले 50 दिवस पूर्ण

1322

 धनगर समाजाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन 

वरोरा 

.           महाराष्ट्रात धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी 50 दिवसाची मुदत मागितली होती. हा 50 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा एरणीवर असतांना आपल्याही धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा. अशी इच्छा धनगर समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात अभ्यास करून उचित निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून देण्यात आले होते. परंतु या दिवसाची मुद्दत संपली असून कोणताही निर्णय आतापर्यंत आला नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आता धनगर समाज उभा झाला असून आणि शांततेत मुख्यमंत्री यांना जिल्हा व तालुका स्तरावर तहसीलदार मार्फत धनगर आरक्षण व सोबतच सात योजनांची मागणी निवेदनात केली आहे.

.           यावेळी वरोरा तहसील कार्यालय वरोरा येथे तहसीलदार योगेश कौटकर यांना वरोरा तालुका धनगर समाज बांधवानी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी निवेदन देते वेळी गजानन शेळके, सोनू येवले, डॉ. सरवदे, प्रभाकर ढाले, संजय बोधे, रवींद्र गावंडे, शिरीष उगे, गणेश चिडे, रमेश चिडे, वसंत खाणेकर, वसंत काळे, रामकृष्ण बोबडे, अशोक वैद्य, श्रेयश झाडें, गजानन नवघरे, ज्ञानेश्वर झिले, अतुल येवले, मंगेश झिले, भारत झिले, प्रफुल करडे, अश्विन धावणे, डॉ संकेत झाडे, विजय धावणे, तुकाराम धावणे, मनोज झाडे, आराध्य धावणे, बंडू, डाखरे, अशोक तुरारे, मारुती धोटे, बंडू ठाकरे, अजिंक्य काळे आशिष गोंडे, निकेश मोटके, दशरथ लाखे पंडित लोंढे, प्रामुख्याने उपस्थित होते,

error: Content is protected !!