जागतिक स्मरण दिन सप्ताह निमित्त वृक्षारोपण व कामगारांना वाहतुक नियमाची माहिती

22

महामार्ग पोलिसांचा उपक्रम

चंद्रपूर

.        जागतिक स्मरण दिन सप्ताह निमीत्य राजोरी स्टील इंडस्ट्रीज मूल येथील कामगारांना वाहतुकीच्या नियमाबाबत माहिती देत कंपनी परिसरात महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गौरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक मनिष रक्षमवार यांची उपस्थिती होती.

.        अप्पर पोलीस महासंचालक रविंद्र सिंघल (वाहतुक) मुंबई, पोलीस अधिक्षक यशवंत सोळंके वाहतुक विभाग नागपुर यांचे आदेशाने स. पो. नि. रवींद्र खैरकर यांचे मार्गदर्शना खाली पो उप नि उमाकांत गौरकार व पोलीस कर्मचारी यांनी मूल येथील राजोरी स्टील इंडस्ट्रीज कंपनीच्या कामगारांना वाहतुकीचे नियमा बाबत ची माहिती त्यांना देवून व त्यांचेशी चर्चा करून प्रबोधन घेण्यात आले. स्मरण दिना निमीत्य वृक्षा रोपन केले. सदर कार्यक्रमास 50 ते 60 कर्मचारी उपस्थित होते.

.        त्यांना खालील प्रमाणे वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. वाहतुकीचे नियम न पाळल्यास अपघात झाल्यावर कुंटुबांचे आर्थीक, मानसीक, शारीरिक नुकसान होवुन वेळ वाया जातो असे कामगारांना समजवून सांगण्यात आले