नागपूर विभागीय कबड्डी स्पर्धेत वरोराच्या चमुने मारली बाजी

39

 सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे यश 

चंद्रपूर

.          डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, रायगड या विद्यापीठाने नागपूर येथे विभागीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या कबड्डी स्पर्धेत सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत यश संपादन केले.

.          डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, नागपूर विभागीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन जे. डी. कॉलेज ऑफ इंजिनीरिंग नागपूर येथे करण्यात आले होते. या विद्यापीठ राज्य स्तरीय स्पर्धेत नागपूर विभागातील विविध कॉलेजच्या संघाने सहभाग नोंदविला, यामध्ये सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी वरोरा येथील संघाने अंतिम लढतीत विजय मिळविला.
या कबड्डी स्पर्धेत धिरज कुंडगीर, हर्ष बोंडे, गौरव चौधरी, गणेश खांडरे, अमित बागडे, मोहित हनमंते, पंकज राऊत या विद्यार्थांनी सहभाग नोंदविला.

.          विजयी विद्यार्थ्यांचे कॉलेजचे अध्यक्ष.प्रसाद पुरूषोत्तम कथडे, प्राचार्य डॉ.रितेश बाठे यांनी अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या या कबड्डी संघास प्रा.संदिप वामन उमरे यांचे मार्गदर्शन लाभले.