तपोभूमी गोंदेडा गुंफा यात्रा महोत्सव नियोजनाची आमसभा उत्साहात

22

नेरी

.         वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत श्री गुरुदेव साधनाश्रम गुंफा समितीची पुढील होणाऱ्या गुंफा यात्रा महोत्सव नियोजन करण्यासाठी दि 19 नोव्हे ला मोट्या उत्साहात आमसभा संपन्न झाली सदर आमसभा ही गुंफा समितीचे अध्यक्ष विठ्ठल सावरकर व गुंफा यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण मोतीराम वाघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या आमसभेला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ बंटी भांगडीया यांची प्रमुख उपस्थिती होती.

.         सदर आमसभेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मारकाचे व भगवान शंकराजी यांच्या मूर्तीचे पूजन करून सुरवात झाली यामध्ये पुढील जानेवारी महिन्यात होणाऱ्या गुंफा यात्रा महोत्सव चे नियोजन यावर चर्चा करण्यात येऊन नियोजन करण्यात आले प्रत्येकांनी यावर आपआपले मत मांडले आणि नव्याने मागील त्रुटी कश्या दूर करता येईल यावर मार्गदर्शन केले, तसेच तपोभूमीचा विकास कशा करता येईल यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली, होणाऱ्या यात्रेच्या खर्चाचे व अनेक कार्यक्रमाचे नियोजन कसे करता येईल यावर सुद्धा विचार मंथन करण्यात आले आणि राष्ट्रसंताच्या कार्याचे प्रचार व प्रसार कसे करता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली तसेच अनेक विषयावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.

.         यावेळी या सभेला चंद्रभान शेंडे, सचिव एन एस भोयर कोष्याध्यक्ष भास्कर वाढई, सहसचिव संतोष रडके, नागभिड गिरीजा गायकवाड, सरपंच घनश्याम डुकरे, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे परशराम ननावरे, घनश्याम चाफले, विवेक कापसे, पंढरीनाथ ढोंगळे, छोटू राचलवार, गिरीश भोपे, पांडुरंग अडसोडे, ममता डुकरे, समीर राचलवार, संजय नवघडे, प्रशांत अदनसरे, प्रा. लोंनबले भरत जाभुले, एकनाथ बोरकर, विनोद हटवादे, भोजराज कामडी, नीलकंठ काटेखाये, वसंता घोडाम, शंकर बावणे तथा सर्व गुरुदेव भक्त भाविक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सामुदायिक प्रार्थनेने आमसभेची यशस्वी सांगता झाली