वरोरा
. येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील नारायणराव वरखडे यांचे वयाच्या 52 व्या वर्षी मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास नागपूर येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मालवीय वार्डातील हिंदू स्मशान भूमी मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.
. यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतिभा धानोरकर, वरोरा शहरातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. सुनिल वरखडे यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या मित्र परिवारात शोककळा पसरली. त्यांच्या मागे आई ,पत्नी, तीन मुली व एक मुलगा, भाऊ, पुतणे असा मोठा आप्तपरिवार आहे.


