Home सामाजिक गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात

गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात

1198

गणेशोत्सव दरम्यान घेण्यात आली होती स्पर्धा : सिनेट सदस्य डॉ. सागर वझे यांची संकल्पना

चंद्रपुर

.             भारतीय जनता पार्टी शाखा वरोरा च्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान घरगुती गणपती सजावट , मोबाईल वरील रिल्स आणि उत्कृष्ट मूर्तिकार अशी स्पर्धा ठेवण्यात आली होती. ही स्पर्धा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सागर वझे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण ७ नोव्हेंबर रोजी चिंतामणी सभागृह वरोरा येथे पार पडला.

.             गणपती उत्सवात गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये शहरातील शेकडो स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये घरगुती गणपती सजावट आणि मोबाईल वरील रिल्स तयार करणे. याचबरोबर उत्कृष्ट मूर्तिकार ज्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी भाजपा पक्षातर्फे ही आगळीवेगळी स्पर्धा वरोरा शहरात डॉ. सागर वझे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली होती. वरोरा शहरातील गणपतीचे चित्रीकरण करून 7 नोव्हेंबर मंगळवारी एका कार्यक्रमा दरम्यान प्रसारण करून भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

.             यावेळी उत्कृष्ट मूर्तिकार चे प्रथम पारितोषिक श्रुतिका कोमटी. उत्कृष्ट रील्स प्रथम पारितोषिक आयुष आसेकर, द्वितीय नीरज चौधरी. उत्कृष्ट गणपती सजावट प्रथम पारितोषिक राहुल मेश्राम, द्वितीय संजय नवघरे, तृतीय श्रेयश लोहकरे, चतुर्थ कुणाल कारशेट्टीवार, तर पाचवे विवेक बोधे यांना देऊन गौरविण्यात आले.

.             यावेळी भाजपाचे नेते देवराव भोंगळे यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, तालुका महामंत्री ओम मांडवकर, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री सायरा शेख, डॉ. अंकुश आगलावे, सुरेश महाजन, मधुसूदन टिपले सह आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!