Home सामाजिक अखिल भारतीय सरपंच परीषद कार्यकारणीत उपाध्यक्ष संकेत सोनवाने यांची निवड

अखिल भारतीय सरपंच परीषद कार्यकारणीत उपाध्यक्ष संकेत सोनवाने यांची निवड

1189

नेरी

.           अखिल भारतीय सरपंच परीषद तालुका चिमूर सरपंच उपसरपंच यांची संयुक्त सभा दि 6 ऑक्टोबर रोज सोमवारला दुपारी १.०० वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह चिमूर पंचायत समिती येथे राजेंद्र कराळे जिल्हाध्यक्ष तथा राज्य सल्लागार, शोभा कोयचाड़े, प्र.तालुकाध्यक्ष, विनोद बारसागडे तालुका सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सरपंच – उपसरपंच यांची सभा घेण्यात आली.

.           त्या सभेत एका वर्षाकरिता सरपंच – उपसरपंच यांची बिनविरोध कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यात म्हसली ग्राम पंचायतीचे सरपंच संकेत सोनवणे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

.           सभेचे संचालन विनोद बारसागडे माजी तालुका सचिव यांनी केले तर प्रास्ताविक व मनोगत राजेंद्र कराळे जिल्हाध्यक्ष यांनी केले.तसेच नवनियुक्त कार्यकारणी सदस्यांचे सर्व तालुक्यातील सरपंच-उपसरपंच यांचे वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले .व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

error: Content is protected !!