भद्रावतीत १३ नोव्हेंबर पासून रोटरी दिवाळी उत्सव मेला

65

भद्रावती

.           दरवर्षी प्रमाणे भद्रावती रोटरी क्लब च्या वतीने भद्रावतीकरांसाठी १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान भद्रावती पोलीस स्टेशन जवळील क्रीडा संकुल मैदानात रोटरी दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

.           या दिवाळी उत्सव मेला मध्ये करमणूक आणि मनोरंजनाची मोठ्या प्रमाणावर मेजवानी असणार आहे यासोबतच खाद्यशौकीनासाठी खाण्याची संबंधित वेगवेगळ्या वीस प्रकारचे स्टॉल असणार आहे यात बिर्याणी कॉकटेल राईस मंचुरियन वडापाव भेळपुरी चाट नूडल्स झुणका भाकरी सर्व थंड पेय तथा आईस्क्रीम यांचा समावेश असेल यासोबतच विविध प्रकारचे पाळणे आकाश झुला कोलंबियास, मौत का कुवा, ट्रेन, पाळणा याचा समावेश असणार आहे तसेच विविध प्रकारचे 120 स्टॉल असतील अशा अनेक स्टॉलचा समावेश असेल यासोबत बंदूक फुगे साबण रिंग इतर खेळांचे दहा स्टॉल असतील या मेळ्यात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे तंबोला आणि फटाका शो असणार आहे ज्या फटाका शोसाठी गेली अनेक वर्ष आहेत निर्माण येथील मेल्या मधे नागरिकांची खुप उपस्थिति राहत होती अशाच प्रकारच्या फटाका शोचे आयोजन करण्यात आले.

.            आहे आकाशात दिसणारी फटाक्याची नयन मनोहर आतिषबाजी हे सर्वात मोठे आकर्षण असणार आहे भद्रावतीकरांचा मेल्यातील अगदी जिव्हाळ्याचा खेळ तथा मनोरंजन म्हणजे तंबोला या तंबोल्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे सतत सात दिवस चालणाऱ्या उत्साहात सातही दिवस वेगवेगळ्या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बॉडी बिल्डिंग स्पर्धा गायन स्पर्धा नृत्य स्पर्धा समूह नृत्य स्पर्धा फॅशन शो यांचा समावेश करण्यातकरण्यात आला आहे. यात सहभागी कलावंताचीऑडिशन द्वारे निवड सुद्धा केल्या गेली आहे ज्या उत्सवासाठी चार एकर मैदानाचा वापर करण्यात आला असून उर्वरित जागा पार्किंगसाठी ठेवण्यात आलेली आहे आयोजकांनी उंच व आकर्षक असे मोठे परिसरात प्रवेशद्वार उभारले असून त्यात त्यात गणेश मंदिर, विजासन बुद्ध लेणी, जैन मंदिर, किल्ला प्रतिकृती, आयुध निर्माण गेट, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ तसेच या शहरातील विविध भागातील दृश्य चित्रित केली आहे या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांदा रोटरी क्लब ने पुढाकार घेतलेला आहे. सर्व नागरिकांनी सहपरिवार येऊन उत्साहाचा आनंद लुटावा असे आव्हान रोटरी क्लब अध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष अब्बास अजानी सचिव सुधीर पारधी कोषाध्यक्ष विक्रांत बीसेण उत्सव समिती अध्यक्ष डॉ. माला प्रेमचंद यांनी केले आहे.