Home सामाजिक मतदार यादीतून स्थलांतरित व बोगस नावे वगळणार

मतदार यादीतून स्थलांतरित व बोगस नावे वगळणार

55

प्रत्येक बूथवर शिवसेनेचे BLA राहणार सक्रिय – आमदार कृपाल तुमाने

वरोरा येथे शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांचा आढावा मेळावा

सुमठाणा सरपंच शुभांगी दातारकर यांचा शिवसेनेत प्रवेश

वरोरा : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरोरा येथे शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा आमदार कृपाल तुमाने होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर प्रकाश टाकत मतदार यादीच्या शुद्धीकरणाचा नारा दिला.

.      आमदार तुमाने यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरावलोकन कार्यक्रमाद्वारे (SIR) मतदार यादीतील त्रुटी दूर केल्या जातील. जे लोक प्रत्यक्ष वॉर्डात राहतात, त्यांचीच नावे यादीत राहतील याची खबरदारी घेतली जाईल. स्थलांतरित झालेल्या आणि बोगस मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

.      या बैठकीत सुमठाणा येथील सरपंच शुभांगी दातारकर यांच्यासह अनेक युवक आणि महिला पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला. आमदार तुमाने यांनी त्यांचे स्वागत करत पक्षवाढीसाठी कामाला लागण्याचे आवाहन केले. तसेच, आगामी परिसीमनानंतर मतदारसंघांची संख्या ३३ टक्क्यांनी वाढणार असल्याने महिलांना राजकारणात मोठी संधी उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

.       यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख नितीन मते, जिल्हा संघटक मुकेश जीवतोडे, भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी, महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, युवा नेते हर्षल शिंदे, आलेख रट्टे यांसह शिवसेनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकांसाठी बुथरचनेपासूनच तयारी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

error: Content is protected !!