Home सामाजिक चंदनखेडा येथे ‘तुकाराम गाथा पारायण’ व ‘अखंड हरीनाम जप सप्ताहा’चे आयोजन

चंदनखेडा येथे ‘तुकाराम गाथा पारायण’ व ‘अखंड हरीनाम जप सप्ताहा’चे आयोजन

143

राम नवमी ते हनुमान जन्मोत्सव दरम्यान भक्तीचा जागर

प.पू. मंगेश महाराजांचे भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथे ब्रह्मलीन प.पु. महादेव महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ चिंताहरण कपिश्वर देवस्थानच्या वतीने एका भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा पारायण, पारमार्थिक शतकोटी सत्संग व कथा’ आणि ‘भव्य अखंड हरीनाम जप सप्ताह’ आज २६ मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे.

चिंताहरण कपिश्वर देवस्थानचे सर्वेसर्वा प.पू. मंगेश महाराज यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अनुयायांसमोर या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली. हा सोहळा २६ मार्च (श्री रामनवमी) पासून सुरू होऊन २ एप्रिल (श्री हनुमान जन्मोत्सव) पर्यंत चालणार आहे.

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
कार्यक्रमाची सुरुवात रामनवमीला व्यास पूजन व घटस्थापनेने होईल. नागपूरचे प्रसिद्ध पंडित सतीश गुरुजी यांच्या हस्ते पौरोहित्य पार पडणार आहे. तसेच, तुकाराम गाथा व्यासपीठ चालक व पारायणाची धुरा ह.भ.प. जीवन महाराज सांभाळणार आहेत. सप्ताहाच्या काळात दररोज काकड आरती, भजन, कीर्तन, पारायण आणि भोजनदान (महाप्रसाद) असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याला प्रामुख्याने गोंदिया येथील ह.भ.प. फलाहरी महाराज आणि गुरुवर्य गणपतरावजी डाहे महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे. प.पू. मंगेश महाराज यांनी महाराष्ट्रभरातील सर्व अनुयायी, साधक आणि भाविक भक्तांना या मंगलप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!