Home शैक्षणिक प्रा. अनिल मांदाडे यांना सेवानिवृत्ती निरोप

प्रा. अनिल मांदाडे यांना सेवानिवृत्ती निरोप

1224

भद्रावती

.           भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय (एमसीव्हीसी) विभागाचे सेवा जेष्ठ प्राध्यापक अनिल दादाजी मांदाडे यांचे नियत वयोमानानुसार आज दि. ३१ मंगळवारी सेवानिवृत्ती निरोप समारंभ यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.

.           या निरोप समारंभ समारोहाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव प्राध्यापक डॉ. कार्तिक शिंदे, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, सत्कारमूर्ती प्रा. अनिल मांदाडे, व त्यांच्या पत्नी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेचे सचिव डॉ कार्तिक शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्राध्यापक अनिल दादाजी मांदाडे यांनी या महाविद्यालयात ३१ वर्षाची प्रदीर्घ सेवा दिली. आज ते नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले आहे. डॉ. कार्तिक शिंदे यांनी मांदाडे यांनी गेले ३१ वर्ष विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेल्या. त्यांना पुढील आयुष्यात काही मदत लागल्यास संस्था त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

.           कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रशेखर जुमडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालययाचे प्राध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!