कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे आश्वासन
चंद्रपुर : राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची १५ मार्च रोजी भेट घेऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (FPC) अडचणी आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेची दखल घेत नामदार जयस्वाल यांनी येत्या १८ मार्च रोजी मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे.
![]()
. या भेटीदरम्यान शेतकरी प्रतिनिधींनी कृषी क्षेत्रातील सद्यस्थिती, शेतकरी उत्पादक कंपन्यांना येणाऱ्या तांत्रिक व आर्थिक अडचणी आणि बाजारपेठेच्या उपलब्धतेबाबत मंत्र्यांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत, राज्यमंत्र्यांनी या विषयांवर ठोस मार्ग काढण्यासाठी शेतकरी प्रतिनिधींना मंत्रालयात पाचारण केले आहे.
बैठकीचे मुख्य मुद्दे
१८ मार्च रोजी होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर चर्चा होणार आहे, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (FPC) कामकाजातील अडथळे.शेतमालाला योग्य भाव आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे, शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करणे, शेतकरी हिताच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी आशा शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.


