भद्रावतीत माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
भद्रावती : पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानांतर्गत भद्रावती तालुक्यातील घोडेपेठ-पाटाळा ग्रामीण मंडळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय मंडल स्तरीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
. भाजपची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि समाजकार्यातील कार्यकर्त्यांची भूमिका यावर मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उद्घाटन सत्रात अहिर यांनी ‘वैचारिक अधिष्ठान’ या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. “राष्ट्र प्रथम, अंत्योदयाचा विचार आणि सामान्यांचा विकास हीच भाजपची बांधिलकी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
. या प्रसंगी आमदार करण देवतळे, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, विधानसभा संघटक किशोर बावणे, अनिल धानोरकर, मंडळ अध्यक्ष श्यामसूनंदर उरकुडे यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. या दोन दिवसीय प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळणार असून, आगामी काळात पक्षकार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.


