Home चंद्रपुर जिल्हा विशेष विसापूर येथील इसमाची आजाराला कंटाळून संपवली जीवनयात्रा

विसापूर येथील इसमाची आजाराला कंटाळून संपवली जीवनयात्रा

279

दिर्घ आजार आणि कौटुंबिक विवंचनेमुळे उचलले टोकाचे पाऊल

बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील वॉर्ड क्रमांक एक मधील रहिवासी मनोज देवराव झाडे (वय ४५) यांनी आजाराला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (दि. २५) रोजी उघडकीस आली असून, बल्लारपूर पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला आहे.

.      मिळालेल्या माहितीनुसार, मनोज झाडे हे मिस्त्री काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, काही काळापासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते. उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे कुटुंबात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या आर्थिक विवंचनेतून कुटुंबात वाद आणि कलह वाढले होते.

.       या मानसिक आणि शारीरिक त्रासातून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक विपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!