Home सामाजिक छायाचित्रकार टेनिस बाल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन

छायाचित्रकार टेनिस बाल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन

1004

 २९ ऑक्टोबरपर्यंत राहणार स्पर्धा ; चंद्रपूर छायाचित्रकार तालुकातर्फे आयोजन 

चंद्रपूर 

.          चंद्रपूर छायाचित्रकार तालुकातर्फे जिल्हास्तरीय शॉर्ट सर्कल-टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे शुक्रवारी (ता. २७) उद्घाटन पार पडले. ही स्पर्धा २९ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. विशेष म्हणजे, सर्व सामन्यांचे प्रक्षेपण यु-ट्युब, फेसबुक लाईव्ह करण्यात येणार आहे.

.          या स्पर्धेचे उद्घाटन कॉंग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पत्रकार संजय तुमराम, विठ्ठल व्यायम शाळेचे पदाधिकारी बंडू दुरुडकर, अशोक अंबिरवार, छायाचित्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन रायपुरे, सचिव फुलचंद मेश्राम, तालुकाध्यक्ष विपिन राऊत, सल्लागार गोलू बाराहाते, सचिव नंदू सोनारकर यांची उपस्थिती होती.

.          या स्पर्धेत जिल्हाभरातील १२ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेदरम्यान ११ सामने खेळविल्या जाणार असून, अंतिम सामना २९ ऑक्टोबरला होणार आहे. विजेत्या संघास ११ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. महेश मेंढे, ध्वनी डेव्हलपर्स आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्रायोजित केले आहेत.

.          स्पर्धेच्या आयोजनासाठी संभाजी येरगुडे, वीजेंद्र गोटाफोडे, जितू क्षिरसागर, अमोल गायधने, विकास जुमडे, टिंकू खाडे, विष्णू मेकर, नरेश वनकर यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.

error: Content is protected !!