Home विदर्भ सिंदेवाहीला मिळाले आता स्थायी तहसीलदार

सिंदेवाहीला मिळाले आता स्थायी तहसीलदार

1003

     संदीप पानमंद तहसीलदार म्हणून झाले रुजू     

सिंदेवाही

.             गौण खनिज आणि वाळू साठी प्रसिद्ध असलेला सिंदेवाही तालुक्याला मागील सहा महिन्यापासून स्थायी तहसीलदार मिळत नसताना अखेर स्थायी तहसीलदार म्हणून संदीप पानमंद नव्याने रुजू झाले आहेत.

.             सिंदेवाही तालुका हा गौण खनिज आणि रेती साठी प्रसिद्ध आहे. मागील तहसीलदार जगदाळे यांचे बदली नंतर आता पर्यंत चार तहसीलदार या तालुक्याला मिळाले आहेत. मात्र कोणतेही तहसीलदार स्थायी नसल्याने या तालुक्यात रेती तस्करी साठी रान मोकळे झाले आहे. स्थायी तहसीलदार नसल्यामुळे या तालुक्याचा कारभार ढेपाळला असून अनेक प्रकरणे थंड बस्त्यात पडलेले आहेत. आता नव्याने स्थायी तहसीलदार म्हणून रुजू झालेले संदीप पानमंद यांचा कार्यकाळ जास्तीत जास्त राहणार असून रुजू झालेले तहसीलदार संदीप जी पानमंद यांना रेती तस्करी थांबविणे गौण खनिज चोरीवर आळा घालने, हे खूप मोठे आव्हान राहणार आहे. स्थायी तहसीलदार मिळाल्याने सिंदेवाही तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लक्ष्मीकांत कामतवार, महेंद्र कोवले, संदीप बांगडे, राकेश बोरकुंडवार, प्रवीण नागदेवते, खालिद पठाण, प्रशांत गेडाम, अमोल बनसोड, इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!