पोलिसांचा धाकच उरला नाही
गडचांदूर
. औधोगिक नागरी गडचांदूर शहर नेहमीच शांत व सवेन्दनशील शहर म्हणून ओडखले जाते .मात्र दि..25 ऑक्टो . रोजी पार पडलेल्या शारदा / दर्गा विसर्जन मिरवणुकीत झलेल्या झगडा भांडणाचा प्रकाराने यंदा शहराच्या शांत व सवेन्दनशील असणाऱ्या प्रतिमेलाच गालबोट लागल्याने ठाण्यात शिंदे मात्र सुरक्षेचे वांदे अशी शहरात चर्चा आहे .
. गडचांदूर शहरात अंदाजे पन्नास शारदा /दुर्गा मंडळाचे विसर्जन धडाक्यात पार पडले. मात्र विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरात शांतता सुववस्था राहावी यासाठी पोलीस विभागाकडून निर्धरोत वेडेत मूर्ती विसर्जन पार पडावे यासाठी करण्यात येणारे नियोजन मात्र कमी पडले. त्यामुळे शहरात भांडण, तंटे, गोंधळ सारखे प्रकार झाल्याचे नागरिकांचे म्हनने आहे.
. शारदा/दुर्गा देवीचा उत्सव हा प्रमुखाने महिलांचा उत्सव, विसर्जन मिरवणुकीतही महिलाची प्राधान्याने उपस्थिती त्यासाठी महिलांचा सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन बंदोबस्तात महिला पोलिसांची संख्या वाढवून महिलांना सुरक्षेची गरज असताना विसर्जन मिरवणूत बंदोबस्तासाठी केवळ चार महिला पोलीसाच्या भरोशावर चाळीस मंडळाच्या महिलांना सुरक्षा बंदोबस्त पुरविणे शक्य होते का ? दिवसे -दिवस अल्पवयीन मुली, महिला यांचेवर होणारे अन्याय – अत्याचार बघता पोलीस विभागसने योग्य नियोजन करून महिला पोलिसां, होमगार्ड यांची अधिक कुमक तैनात करणे गरजेचे होते.
. शहारत झालेल्या विसर्जन मिरवणुकीत पोलीस विभागाकडून योग्य नियोजनाचा अभाव जाणवला त्यामुळे विसर्जन मिरवणुकी दरम्यान गडबड, गोंधळ, मद्यपीची थिरलबाजी, भांडण, तंटे सारखे प्रकार समोर आल्याने, महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाल्याचे शहरातील जाणकारांचे मत आहे.

