ग्राहक पंचायतीची आग्रही मागणी
वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी भद्रावती पोलिसांना निवेदन
भद्रावती : चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावतीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
. महामार्गावरील बाळासाहेब ठाकरे गेट समोरील चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. ही कोंडी फोडण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८:३० या गर्दीच्या वेळेत किमान दोन वाहतूक पोलीस (ट्रॅफिक पोलीस) कायमस्वरूपी तैनात करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, मुख्य महामार्गावर बस स्थानक चौक ते चंदनखेडा फाटा या दरम्यान जड वाहने अस्ताव्यस्त उभी केली जातात, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या संपूर्ण भागाला ‘नो पार्किंग झोन’ घोषित करून तिथे जड वाहनांच्या पार्किंगवर बंदी घालावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
. निवेदन देतेवेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण चिमूरकर, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, सहसचिव करुणा मोघे, संघटक सोनल वावरे तसेच सदस्य विनोद ठमके आणि प्रतिक्षा बनकर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


