पंचक्रोशीतील ४0 भजन मंडळाचा सहभाग
हजारोंवर भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
बल्लारपूर : तालुक्यात शेवटच्या टोकावर व वर्धा नदीच्या तिरावर हडस्ती गाव आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम सातशेवर आहे. मात्र या गावाला श्री. सदगुरू जगन्नाथबाबा देवस्थान दरवर्षी भाविकांना भक्तीमय वातावरणाची भेट देत आहे. यावर्षी श्री सदगुरू जगन्नाथबाबा मूर्ती स्थापना दिवस व मारोती महाराज जन्मोत्सव रविवार (दि. ८) व सोमवार (दि. ९) फेब्रुवारी ला साजरा केला. यामध्ये पालखी मिरवणुकीत पंचक्रोशीतील तब्बल ४0 भजन मंडळींनी सहभाग घेत भक्तीमय वातावरणाची अनुभूती दिली. हजारोंवर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत सामाजिक एकतेचा संदेश दिला. यानिमित्त हडस्ती जगन्नाथबाबा पालखी पालखी मिरवणुकीत भाविकांची मंदीयाळी दिसून आली. विशेष म्हणजे मां. कामाक्षी म्युझिकच्या भक्तीरसातील गीतगायनाने भाविकांना भक्ती मध्ये तल्लीन केले.
![]()
![]()
. बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती येथे श्री. सदगुरू जगन्नाथबाबा देवस्थान समितीच्या वतीने जगन्नाथबाबा मूर्ती स्थापना दिन व मारोती महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सलग दोन दिवस चालणाऱ्या सोहळ्यामुळे अवघ्या पंचक्रोशीत भक्तीमय वातावरण निर्माण होते. पहिल्या दिवशी गावातील आबालवृद्ध एकोप्याने गावाची स्वच्छतेचे दर्शन घडवते. यामध्ये तरूणांचा सहभाग मोठा असतो. यानिमित्त विधायक कार्याची अनुभूती मिळते. घट स्थापना झाल्यावर कीर्तनातून प्रबोधन करण्याची पंरपरा गावकरी जोपासत आहे.
. दुसऱ्या दिवशी पहाटे मारोती महाराज यांच्याहस्ते सदगुरू जगन्नाथबाबा मूर्ती समोर पुजाअर्चना करून मंगलमय भावना व्यक्त केली जाते. पंचक्रोशीतील भजन मंडळाचा सहभाग, सजवलेल्या बैलगाडीतून पालखी मिरवणूक डोळ्याचे पारणे फेडते. घरांच्या दारासमोर रांगोळी भाविकांचे आदरातिथ्य करते. यामुळे सदगुरू जगन्नाथबाबा देवस्थान परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. दहीहंडी कार्यक्रमाच्या नंतर पंचक्रोशीतील भाविकांना पंगत बसवून महाप्रसाद वितरण करण्याचा प्रसंग ‘अतिथी देवो भव’ याची प्रचिती देणारा ठरला आहे. किर्तनकार ह. भ. प. शरद महाराज वैद्य, खेमराज महाराज कायर (पिपरी), मोरेश्वर महाराज आणि ज्यांच्या नावाने जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो, असे मारोती महाराज यांचे आदरातिथ्य भाविकांकडून केले जाते.
. सामाजिक सौहार्दाच्या सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्ये ठरत आहे. या सोहळ्याला सदगुरू जगन्नाथबाबा देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांचे व मत तथा मन भेद विसरून केलेल्या परिश्रमाचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणा देणारे ठरत आहे.


