Home सामाजिक आ. सुधीर मुनगंटीवारांचा ‘चाणक्य’ राजकीय मुत्सद्देगिरी

आ. सुधीर मुनगंटीवारांचा ‘चाणक्य’ राजकीय मुत्सद्देगिरी

323

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता

संगीता खांडेकर महापौर तर प्रशांत दानव उपमहापौर !

शहराच्या विकासासाठी मित्रपक्षांची वज्रमूठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निधीसाठी पाठिंबा

उबाठा आणि स्थानिक गटांच्या सहकार्याने भाजपचा झेंडा

चंद्रपूरला ‘मॉडेल सिटी’ बनवण्याचा संकल्प

चंद्रपूर : राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली चंद्रपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी, तर प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.

.      भारतीय जनता पक्षाने चंद्रपूर महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी आ. मुनगंटीवार यांच्या खांद्यावर सोपवली होती. त्यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत मित्रपक्षांना सोबत घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन केली. या विजयानंतर नवनियुक्त महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, “हा विजय शहराच्या विकासाला नवी उभारी देणारा ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा टप्पा गाठला आहे.”

एकजुटीने विकासाचा नवा अध्याय
ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असल्याचे मुनगंटीवारांनी स्पष्ट केले. भाजपसोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उबाठा गट आणि संदीप गिऱ्हे यांचा गट विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आला आहे. संदीप गिऱ्हे, प्रशांत दानव आणि नंदू नागरकर यांच्या सहकार्याबद्दल मुनगंटीवारांनी विशेष आभार मानले.

निधीची कमतरता भासणार नाही – मुख्यमंत्री
शहराच्या प्रगतीसाठी राज्य सरकार खंबीरपणे पाठीशी उभे आहे. “चंद्रपूरच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे आ. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. चंद्रपूरचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करून, हे शहर राज्यातील एक ‘आदर्श शहर’ म्हणून विकसित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!