Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींवर ‘प्रशासकराज’

बल्लारपूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींवर ‘प्रशासकराज’

322

१२ सरपंचांसह १०६ सदस्य कार्यमुक्त

जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर आता ग्रामपंचायतींचा कारभारही प्रशासकांच्या हाती

निवडणुका लांबल्याने ग्रामीण विकासाची धुरा अधिकार्‍यांकडे

बल्लारपूर : मागील चार वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती चा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. आता पुन्हा ग्रामपंचायतवर देखील प्रशासकराज आले आहे.बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहे. यापैकी १२ ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती आला आहे. यामुळे १२ सरपंचासह १0६ सदस्यांना घरी बसण्याची पाळी आली आहे.

.       बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विसापूर ग्रामपंचायत मुदत ५ फेब्रुवारी २०२६रोजी संपुष्टात आली आहे. यामुळे येथे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून कारभार करणार आहे. तालुक्यातील नांदगाव (पोडे), मानोरा, कळमना, हडस्ती, पळसगाव, कोर्टीमक्ता, गिलबीली, आमडी, किन्ही येथील ग्रामपंचायतीची मुदत देखील ४ फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. त्याचप्रमाणे लावारी व दहेली या ग्रामपंचायतीची मुदत ६ आगस्ट २0२४ रोजी संपली आहे. यामुळे या सर्व ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे.

.       लावारी, दहेली, आमडी, किन्ही, हडस्ती व कोर्टीमक्ता येथील प्रत्येकी ७ असे एकूण ४२ सदस्य, मानोरा, कळमना, गिलबीली व पळसगाव येथील प्रत्येकी ९ असे एकूण 3६ सदस्य, नांदगाव (पोडे) येथील ११ व विसापूर येथील १७ असे एकूण सरपंचासह १0६ सदस्यांचा कारभार आता प्रशासक सांभाळणार आहे.

.       ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत असी त्रीसूत्री व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक लांबल्याने चार वर्षापासून प्रशासकराज आहे. आता या मालिकेत ग्रामपंचायतीचा समावेश झाल्यामुळे ग्रामीण विकासाचा डोलारा प्रशासकीय व्यवस्था हाकणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक किमान वर्षभर लांबणीवर जाण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.

error: Content is protected !!