Home सामाजिक वरोऱ्यात २० जानेवारीला भव्य मोफत कॅन्सर निदान शिबिर

वरोऱ्यात २० जानेवारीला भव्य मोफत कॅन्सर निदान शिबिर

367

गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळ्याचेही आयोजन

आ. मुनगंटीवार यांची संकल्पना व आ. देवतळे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य उपक्रम

वरोरा : वरोरा शहर आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्य हितासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल, चंद्रपूर (टाटा मेमोरियल ट्रस्ट, मुंबई) आणि स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत कॅन्सर रोग निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कॉलरी वॉर्डातील कल्याणेश्वर हनुमान मंदिर येथे मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.

आरोग्य शिबिर आणि धार्मिक सोहळा
.        हे शिबिर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आणि आमदार करण देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. कॅन्सरचे प्राथमिक निदान, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि पुढील उपचारांविषयी मार्गदर्शन अशी या शिबिराची व्याप्ती असेल. शिबिराची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

.        आरोग्य शिबिरासोबतच कल्याणेश्वर हनुमान मंदिर येथे श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत धार्मिक विधी पार पडतील, तर सायंकाळी ७ वाजता नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

आयोजक आणि परिश्रम
.        नगरसेविका मनीषा संजय दानव यांच्या पुढाकाराने या सर्व कार्यक्रमांचे भव्य नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे संस्थेचे संस्थापक सचिव आशिष मारोती घुमे, उपाध्यक्ष संजय दानव तसेच कल्याणेश्वर गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.

.       वरोरा शहर व परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!