Home सामाजिक बामणी (दुधोली) येथे विदर्भस्तरीय भजन स्पर्धा 

बामणी (दुधोली) येथे विदर्भस्तरीय भजन स्पर्धा 

625

बल्लारपूर : तालुक्यातील बामणी (दुधोली) येथे जय श्रीराम पदावली भजन मंडळाच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हनुमान मंदिराच्या प्रांगणात १६ ते १८ जानेवारी दरम्यान विदर्भस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा उदघाटन समारंभ शुक्रवार (दि.१६) जानेवारीला सांयकाळी ७ वाजता होणार आहे.

.       बामणी (दुधोली) येथील विदर्भस्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सह उदघाटक म्हणून बामणीचे उपसरपंच सुभाष ताजने राहणार असून अध्यक्षस्थानी सरपंच प्रल्हाद आलाम राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे,मोहनदास मेश्राम,मारोती सातपुते,लोमेश मडावी यांची उपस्थिती राहणार आहे.

.       यावेळी बल्लारपूरच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अलका अनिल वाढई व नवनिर्वाचित सदस्य लखनसिंग चंदेल यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश खडके, किशोर मत्ते, सुभाष पिंपळशेंडे, बामणीचे ग्रामपंचायत सदस्य शेख जमील, श्रीहरी अंचूर, संजय गोधळी, नरेश उईके, संतोष मडावी, दिपाली कोटनाके, वर्षा आलाम, सरला जुआरे, विजया मडावी, सुजाता दुपारे, कविता खामनकर, गिता वाघाडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

error: Content is protected !!