मारोडा येथील 474 व भेजगावात 26 घरकुल लाभार्थ्यांना मिळणार लाभ
स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार
चंद्रपुर : मारोडा येथे घरकुलासाठी लागणाऱ्या मोफत रेती वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करताना अपार समाधान व आनंद आमदार सुधीर मुनगंटीवार यांना झाला. मारोडा येथील 474 तसेच भेजगाव येथील 26 घरकुल लाभार्थ्यांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळत असून त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. मोफत रेती वाहतुकीसाठी सीएसआर निधीतून आर्थिक मदत देत सामाजिक उत्तरदायित्वाची कर्तव्यदक्ष भूमिका बजावल्याबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनस्वी आभार मानले.
मारोडा येते घरकुलासाठी लागणाऱ्या मोफत रेती वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करताना अपार समाधान व आनंद आमदार सुधीर मुनगंटीवार यांना झाला. मोफत रेती वाहतुकीसाठी सीएसआर निधीतून आर्थिक मदत देत सामाजिक उत्तरदायित्वाची कर्तव्यदक्ष भूमिका बजावल्याबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनस्वी आभार मानले.
सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आतापर्यंत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 14 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यातील निधीही लवकरच प्राप्त होऊन कामांना वेग येणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 5 ब्रास मोफत रेती देण्याचा उपक्रम बल्लारपूर मतदारसंघातूनच राबविला गेला आणि या लोककल्याणकारी कार्याचे कौतुक राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेतही केले, असे मुनगंटीवार यांनी संगितले.
घरकुल लाभार्थ्यांच्या स्वप्नांना पंख, विकासाच्या वाटचालीला दिशा आणि सामान्य जनतेच्या जीवनात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडविण्याचा दृढ संकल्प यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.


