Home सामाजिक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार कृतीत आणणे हेच खरे अभिवादन – आ....

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार कृतीत आणणे हेच खरे अभिवादन – आ. सुधीर मुनगंटीवार

436

वरोरा तालुका माळी समाजाच्या वतीने आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार

चंद्रपुर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मांडलेले विचार केवळ शब्दांत न ठेवता, ते आपल्या कृतीतून अंगीकारणे आणि समाजाच्या उन्नतीसाठी व्यापक प्रयत्न करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल असे आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते वरोरा तालुका माळी समाज सेवा मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

.       वरोरा तालुका माळी समाज सेवा मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माळी समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल हा गौरव करण्यात आला.

.       वरोरा तालुका माळी समाज सेवा मंडळ यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. असंख्य अडचणींवर मात करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या, स्त्री-शिक्षणाचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या आणि सामाजिक क्रांतीची मशाल प्रज्वलित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.

.       आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, माळी समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याची संधी मला मिळाली. माझ्या अर्थमंत्रीपदाच्या काळात पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे गौरवपूर्ण नाव देण्यासाठी मोलाची भूमिका बजावता आली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वारसदारांना शासकीय नोकरी मिळावी यासाठी शासनाकडे आग्रही मागणी करून त्यांना न्याय देता आला. तसेच महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमताने संमत झाला, यासाठी मला पुढाकार घेता आला. विधानसभेत विशेष चर्चा घडवून आणून भिडेवाड्यामध्ये भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. माळी समाजासाठी मुल आणि पोंभूर्णा येथे सभागृहही बांधण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या उन्नतीसाठी मांडलेला विचार अधिक व्यापक होत पुढे जावा आणि प्रत्येकाने तो आपल्या कृतीतून अंगीकारावा हिच त्यांना जयंतीनिमित्त खरे अभिवादन ठरेल असे म्हणाले.

.       यावेळी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, नगर परिषद वरोरा च्या नवनियुक्त नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, नगरसेवक प्रवीण चिमुरकर, सावित्रीबाई शक्ती केंद्र नागपूर च्या प्रा. जयश्री सातारकर, माळी समाज अमरावती चे प्रदेशाध्यक्ष अॅड. श्रीकांत नागरीकर, माळी समाज वरोरा चे तालुकाध्यक्ष राजू डोंगरे, विठ्ठलराव बोबडे, निंबाळकर, सुरज बोबडे यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!