भद्रावती : लुम्बिनी नगर, भद्रावती येथे ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ आणि माता फातिमा शेख यांची संयुक्त जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष आणि थोर वीरांगनांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत एका सुश्राव्य स्वागत गीताने झाले. या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक मुला-मुलींनी तसेच महिलांनी थोर महापुरुष आणि वीरांगनांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लहान मुले आणि महिलांचा ‘सांस्कृतिक वेशभूषा फॅशन शो’ ज्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
![]()
. याप्रसंगी मंचावर लुम्बिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा फुलझेले, लुम्बिनी बौद्ध मंडळाचे अध्यक्ष कुलीन शेंडे, विजू पाटील, हर्षकुमार उराडे, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा शशिकला डांगे आणि सदस्या सुषमा नगराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाच्या सचिव शिल्पा खाडे, चंदा उराडे आणि प्रियांशी खाडे यांनी केले. प्रास्ताविक रिता फुलझेले यांनी तर आभार नलिनी वनकर यांनी मानले.
. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली शेंडे, वैशाली नगराळे, भारती तितरे, मिनल गायकवाड, दिक्षा पाटील, भारती कांबळे, मालती पाटील, कुंदा खाडे, रिना पाझारे, प्राजक्ता जिवने, विद्या सोनटक्के, अर्चना गेडाम आणि जया मेश्राम यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


