वरोरा
. हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे नवरात्री उत्सवाचे अवचित्या साधून एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केल्या जाते. अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यालयाचे मुख्याध्यापक रविकांत जोशी यांच्या नवकल्पनेतून साकारल्या जातात. यावर्षी सुध्दा अशाच प्रकारे आरती नृत्य स्पर्धेचे आज आयोजन केले गेले. ही स्पर्धा तीन टप्प्यात घेतल्या गेली पहिल्या सत्रात कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
. या कार्यक्रमासाठी भारत शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णकांत लोया, प्राचार्य रविकांत जोशी, उपप्राचार्य पवार हे उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात सकाळी 12.00 वा. घेण्यात आल्या व तिसरे सत्र दुपारी 3.00 वाजता घेण्यात आले.
. या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून वरोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप गोडशेलवार, संस्थेचे सदस्य श्याम लोया, प्राचार्य रविकांत जोशी, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मांडवकर, दै. देशोन्नतिचे पत्रकार तसेच वरोरा कृउबा चे संचालक बाळु भोयर, उपमुख्याध्यापक सुनीता मुळे, पर्यवेक्षक अर्चना ढोले, प्रभाकर ढाले, महेश डोंगरे यांची उपस्थिती होती. परीक्षक म्हणून हिरालाल लोया कनिष्ठ महा.चे माजी प्राध्यापक परेश भेले, विजय मेश्राम, अर्चना घोडे, खैरे, साखरकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्याचे प्रदर्शन करून आनंद घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रज्ञा कथलकर, महिमा चोरडिया, जांभूळे, वीणा आंबटकर, माया बजाज, स्मिता आस्वले, नंदा देवतळे, महेश टेंभूरडे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सकाळच्या सत्रात प्रज्ञा कथलकर तर दुपारच्या सत्रात बजाज, आंबटकर यांनी केले तर आभार नंदा देवतळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुध्धा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हातभार लावला.


