विविध मांगण्यासाठी पुकारला बेमुदत संप
नागभीड
. आशा व गटप्रवर्तकाच्या विविध प्रलंबीत मागण्यासाठी बेमुदत संप पुकारात आशा व गटप्रवर्तकाचा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
. महाराष्ट्रा मध्ये सन 2005 पासुन राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाली.सध्या महाराष्ट्रा मध्ये गटप्रवर्तकाची संख्या साडेतिन हजारा पेक्षाही जास्त आहे.यात बहुतांशी गटप्रवर्तक पदविधर आहेत. गटप्रवर्ताकाची नेमणुक सरकार करते. माञ अल्प मानधनावर आशा व गटप्रवर्तकांना राबविल्या जाते. त्यामुळे गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, वेतनश्रेनी व भात्ते लागु करावेत, गटप्रवर्तकांना प्रवासखर्चा व्यतीरीक्त दरमहा निश्चित रक्कम द्यावी, गटप्रवर्तकांना आनलाईनची कामे विना मोबदला सांगु नये, अकरा महीन्यांचे आदेश दिले जातात ते न देता सेवेत सामावुन घ्यावे.
. गटप्रवर्तकांना सुपरवायझर म्हणून संबोधावे. केंद्र सरकारणे 2018 पासुन गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ केली नाही.त्यामुळे किमान वेतन लागु करावे. आशा गटप्रवर्तक कर्तव्यावर असतांना कींना नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना तत्काळ दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, जिप अंतर्गत रीक्त पदावर नविन भरती करतांना दरवर्षी दहा टक्के जागा गटप्रवर्तका साठी राखीव ठेवाव्यात. आदी मागण्या निवेदनातुन करण्यात आल्या आहेत. या बेमुदत संपात नागभीड तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या आहेत. मागण्याचे निवेदन तहसिलदार, संवर्ग विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला सादर करण्यात आले.

