Home चंद्रपुर जिल्हा विशेष दुचाकीच्या अपघातात इसमाचा मृत्यू

दुचाकीच्या अपघातात इसमाचा मृत्यू

467

बल्लारपूर – विसापूर मार्गावरील घटना

चारचाकी वाहनाने दिली धडक

बल्लारपूर : गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील गावावरून एक इसम दुचाकी वाहनाने स्वगावी बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती येथे जात होता. दरम्यान विसापूर – बल्लारपूर मार्गावरील वळणावर दुचाकी अनियंत्रित झाली. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला जबरदस्त धडक बसली. या धडकीत दुचाकीस्वार इसम गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना बल्लारपूर – विसापूर मार्गावर शुक्रवार (दि. १९) दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव पांडुरंग गणपती झाडे (४५) रा. हडस्ती ता. बल्लारपूर असे आहे.

.       बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती येथील पांडुरंग झाडे हे दुचाकीने गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कार व तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आटोपून हडस्ती गावी दुचाकीने येत होता. त्याची दुचाकी क्रमांक (एम.एच.3४ – बी.एल. ६८७५) ही बल्लारपूर – विसापूर मार्गावरील एका वळणावर चंद्रपूर कडून बल्लारपूर कडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एम.एच.34 – बी.झेड. ७४८५) ला जबरदस्त धडक दिली. आमनेसामने झालेल्या धडकीत दुचाकीस्वार पांडुरंग झाडे याच्या डोक्याला गंभीर दु:खापत झाली. जखमी अवस्थेत त्याला बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथे प्रथमोपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्याला चंद्रपूर येथे नेताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले असल्याने त्याचा संसार उघड्यावर आला आहे. या घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहे.

error: Content is protected !!