नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक रंगतदार
कांग्रेसच्या उमेदवारांची मतदारांना आर्जव
बल्लारपूर : बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबरला होत आहे. शहरात निवडणुकीचा रणसंग्राम रंगतदार होत आहे. कांग्रेस पक्षाच्या बंडाळीनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका अनील वाढई यांनी प्रचाराच्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांना तगडे आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी त्यांनी त्यांचे पती व सीडीसी बँक संचालक डॉ. अनील वाढई व वार्डावार्डातील त्यांचे सहकारी नगरसेवक पदांचे उमेदवारांसोबत कांग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी मतदारांना आर्जव करत आहे.
![]()
. बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी अध्यक्ष अब्दुल करीम, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, माजी नगराध्यक्ष डॉ. मधुकर बावणे यांच्या सोबत येथील कांग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका वाढई, त्यांचे पती डॉ. अनील वाढई तथा कांग्रेसचे जीवाभावाचे कार्यकर्ते येथील कांग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी दारोदारी जात मतदारांना निवडून देण्यासाठी आर्जव करत आहे. यावेळी थेट मतदारांतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने अख्ये शहर नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांना पिंजून काढावे लागत आहे. अशातच कांग्रेस अध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका अनिल वाढई यांचा प्रचाराचा धडाका वाढत असून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना चांगलाच घाम फोडल्याचे दिसून येत आहे.
. विशेष म्हणजे मागील ४७ वर्षापासून डॉ. अनिल वाढई वैद्यकीय क्षेत्रात आहे. ते व त्यांच्या पत्नी अलका वाढई यांचा येथील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात मागील ११ वर्षापासून सक्रिय संचालक म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे डॉ. अनील वाढई व अलका वाढई कांग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. आजच्या प्रचाराच संतोषी माता वार्डातील नगरसेवक पदाचे उमेदवार प्रियंका भारत थुलकर व सय्यद मुक्कदर हमजा शेख, बुद्ध नगरवार्डातील सुयोग मधुकर खोब्रागडे व मिना नरेश मुंदडा, प्रभाग ९ मधील माजी नगरसेवक नासीर खान व ॲड.मेघा भाले, प्रभाग सात मधील वैशाली मिलींद हुमने व शेख अब्दुल करीम, प्रभाग सहा मधील मोना प्रमोद धानोरकर व शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या कार्यकर्त्यांसह डॉ. अनील वाढई व नगराध्यक्ष पदाच्या कांग्रेसच्या उमेदवार अलका वाढई यांनी प्रचाराच्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांना आव्हान उभे केले आहे. दिवसेदिवस बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दरम्यान कांग्रेसची सत्ता येण्याची शक्यता मतदारात वर्तवली जात आहे. भाजप व उबाठा शिवसेना पक्षाला शह देण्याचा प्रयत्न चालविला असलेल्याने प्रतिस्पर्ध्यांना चांगलाच धाक निर्माण झाल्याचे चिन्ह शहरात दिसून येत आहे.


