संविधान दिना निमित्त आयोजन
भद्रावती : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी आपल्या देशाला संविधान दिले म्हणून दि. २६ नोव्हेंबर हा दिवस आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय संविधान दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. भारतीय संविधानचा अमृत महोत्सव निमित्य बार्टी चे समतादूत गणेश हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू विद्यालय चंदनखेडा व शौर्य क्रीडा मंडळ चंदनखेडा एकत्रित येऊन दौड फॉर संविधान घेण्यात आले तसेच भारताचे संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन, वक्तृव स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पदयात्रा, कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व नेहरू विद्यालय चंदनखेडा यांनी केले होते.
. सर्व उपस्थितांना विद्यार्थी विद्यार्थिनी यांना संविधानाचे महत्व, संविधानानी, दिलेले अधिकार व जबाबदारी याची जाणीव व्हावी या उद्देशाने उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसरपंच विठ्ठल हनवते, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोहर हनवते, अध्यक्ष निवडींग प्रमुख पाहुणे ब्राह्मणकर, कासारे, लोणकर, जिकार, आस्कर, मडावी, देवा पांढरे हे उपस्थित होते.
. भारतीय संविधान हे न्याय स्वातंत्र्य, समता, बंधुता,या तत्वावर, आधारित असुन सर्वांना सामाजिक, आर्थिक, धार्मिक, स्वातंत्र्य प्रधान करते, त्यामुळे या देशात विविध जाती धर्माचे लोक असुन सुद्धा एकत्रित राहतात. भारतीय संविधान आपण सर्व भारतीय आहोत एक आहोत याची जाणीव करून देते. संविधानामुळे या देशात अखंडता, एकता आजही टिकून आहे. संविधानाने दिलेले हक्क व जबाबदारी याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने उद्देशिकाचे सामूहिक वाचन घेण्यात आले. भारतीय संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन बार्टिचे समतादूत गणेश हनवते यांनी केले व उपस्थित असलेल्या सर्वांना भारतीय संविधानचा अमृत महोत्सव निमित्य संविधान जागर अभियानातून संविधानाच्या प्रचार, प्रसार व जनजागृती करण्याचा निर्धार केला.
. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडींग सर यांनी संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले कार्यक्रमाचे संचालन स्नेहल यांनी तर आभार अनुराधा जांभुले यांनी मानले. या क्रार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व नेहरू विद्यालय चंदनखेडा, यांनी केले शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा चे सदस्य कुणाल ढोक, देवानंदन चोखे , आशिष हनवते यांनी कार्यक्रम यशस्वीतवेसाठी सहकार्य केले.


