टिया बोबडे हिची राज्यस्तरावर निवड

75

वरोरा

.           नागपूर विभागीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धा 2023-24 गडचिरोली येथे संपन्न झाली. त्यात 14 वर्षाखालील मुलींमधून हिरालाल लोया विद्यालयाची विद्यार्थिनी टिया बोबडे हिने इंडियन राउंड मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल हिरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व अध्यापक /अध्यापिका, कर्मचारी व्रुन्द तसेच हिरालाल लोया विद्यालय तथा कनिष्ठ महा. चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य रविकांत जोशी, उपमुख्याद्यापिका सुनीता मुळे, पर्यवेक्षक अर्चना ढोले, प्रभाकर ढाले, महेश डोंगरे यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

.           टिया बोबडे हिची राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा मुंबई येथे होणार आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने प्रशिक्षक जयेश बोढे, राजेंद्र चिकटे, महेश डोंगरे, बंडू कळसकर, आपले आई वडील आणि विद्यालयातील सर्व अद्यापक/अध्यापिका यांना दिले आहे.