उमेदवार निवडीवरून अनेकांची नाराजी
कांग्रेसच्या 32 उमेदवारांची अधिकृत घोषणा
बल्लारपूर : बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक साठी आज कांग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची सोमवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अलका अनील वाढई यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. त्याच प्रमाणे 34 नगरसेवक पदांपैकी 32 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यामुळे मी ज्यांना उमेदवारीचे तिकीट मिळाली नाही, अशांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. यामुळे २ डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीचे चित्र कांग्रेससाठी तळ्यात मळ्यात ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर नगरपालिका सर्वात मोठी आसून येथील मतदारांची संख्या ८3 हजार ८२१ इतकी आहे. यात ४१ हजार ७५४ महिला, तर ४२ हजार ६६ पुरुष मतदार आहे. येथील मतदार नगराध्यक्ष पदासह 34 नगरसेवकांची निवड करणार आहेत. कांग्रेसने आज सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी अलका अनील वाढई यांच्या गळ्यात माळ घातली आहे. त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी प्रभाग एक मधून माजी नगराध्यक्ष छाया मडावी व शिवबचन राजभर यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग दोन मध्ये निशीकांत खैरे व वैष्णवी अजय जुमडे, प्रभाग तीन ॲड. पवन मेश्राम व शिल्पा चुटे, प्रभाग चार मध्ये अंकुबाई मुक्या व ताहेर हुसेन नासिर मोहम्मद शेख, प्रभाग पाच मध्ये वर्षा दानव, प्रभाग सहा मध्ये मोना प्रमोद धानोरकर व शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, प्रभाग सात मध्ये वैशाली मिलींद हुमने व शेख अब्दुल करीम अब्दुल रहीम, प्रभाग आठ मध्ये प्रियंका भारत थुलकर व सय्यद मुक्कदर सय्यद हमजा, प्रभाग न ऊ मध्ये एम. व्यंकटेश बाल बरैय्या व ॲड. मेघा भाले, प्रभाग दहा मध्ये सुयोग खोब्रागडे व मिना नरेश मुंदडा असे कांग्रेसचे उमेदवार आहे.
. प्रभाग अकरा मध्ये शारदा भास्कर माकोडे व इस्माईल ढाकवाला, प्रभाग बारा मध्ये यश दिलीप माकोडे व सुनिता गजानन जीवतोडे, प्रभाग तेरा मध्ये विनोद आत्राम व नंदा ठाकूर, प्रभाग चौदा मध्ये कांचन विनेश गुंडलापेल्ली व रवि चंद्रय्या मातंगी, प्रभाग पंधरा मध्ये सुर्यकांत साळवे, प्रभाग सोळा मध्ये पंकज बहुरिया व करुणा रेब्बावार, तर प्रभाग सतरा मध्ये ज्योती ओमप्रकाश बहुरिया व लक्ष्मण बिहारी यादव यांना कांग्रेसने नगरसेवक पदासाठी संधी दिली आहे.


