Home सामाजिक आनंदवनात ज्येष्ठ समाजसेविका कमलताई गवई यांची रविंद्र शिंदे यांनी घेतली भेट

आनंदवनात ज्येष्ठ समाजसेविका कमलताई गवई यांची रविंद्र शिंदे यांनी घेतली भेट

539

 वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीता’ ग्रंथाची भेट

वरोरा : थोर समाजसेवक श्रद्धेय बाबा आमटे यांच्या जगप्रसिद्ध आनंदवन येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेविका कमलताई गवई यांची मित्रपरिवार व आप्तेष्टांसह सदिच्छा भेट घेतली. कमलताई गवई या देशातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आहेत.

.        या प्रसंगी शिंदे यांनी त्यांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ भेट दिला. यावेळी विविध सामाजिक व विकासविषयक मुद्यांवर परस्पर चर्चा करण्यात आली. शिंदे यांनी कमलताईंचे आशीर्वाद घेत त्यांच्या दीर्घ कार्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. “ही भेट आनंदाची आणि स्मरणात राहणारी ठरली,” असे शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

.      या प्रसंगी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, जिल्हा बँकेचे संचालक जयंत टेमुर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजु डोंगे, तसेच राजीव मिश्रा, सुधाकर कडू, राजेश ताजने, संजय उमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!