लावारी जंगल परिसरातील घटना
नेरी
. नेरीवरून जवळ असलेल्या लावारी जंगल परिसरात एका पट्टेदार वाघाने चरत असलेल्या गाई च्या कळपावर हल्ला चढवून गोऱ्याला ठार केले सदर घटनेची माहिती गुऱ्याख्याने नागरिकांना दिली.
. लोहारा येथील भास्कर सावसाकडे यांच्या मालकीचा गोरा आज दि 16 ऑक्टोबर ला दुपारच्या सुमारास वाघाने चरत असलेल्या गुरावर हल्ला करून गोऱ्याला ठार केले सदर गुरे हे लोहारा येथील असून चाराईसाठी लावारी जंगल परिसरात नेले असता वन कक्ष 454 मध्ये गुरे चरत आले असता दबा धरून बसलेल्या एक मोट्या पट्टेदार वाघाने गुरावर हमला चढवला.
. गोऱ्याला पकडून जागीच ठार केले त्यामुळे बाकी गुरे इतरत्र पळाले सदर घटनेची माहिती वनविभागाचे वनक्षेत्र नेरी येथील क्षेत्रासहायक रासेकर याना देताच त्यांनी तात्काळ वनअधिकारी कर्मचारी घटनास्थळी पाठविले सदर मृत गोऱ्याचे पंचनामा करून वाघावर पाळत ठेवण्यासाठी कमेरे लावण्यात आले.
. आहे सदर घटनेने लावारी व लोहारा येथील शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली असून झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या गोऱ्याच्या मालकाला नुकसानभरपाई देण्यात यावी आणि वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी लोहारा व लावारी येथील शेतकरी वर्ग व नागरिकांनी केली आहे

