Home सामाजिक वरोरा पंचायत समिती येथे गण आरक्षणाची सोडत 13 ऑक्टोबरला

वरोरा पंचायत समिती येथे गण आरक्षणाची सोडत 13 ऑक्टोबरला

598

वरोरा : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका 2025 संदर्भात राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या 1 ऑक्टोबर 2025 रोजी प्राप्त पत्रानुसार वरोरा पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

.       या सोडतीची कार्यवाही महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9(1), महाराष्ट्र जिल्हा परिषद (निवडणूक विभाग व निवडणुका घेण्याबाबत) नियम 1962 चा नियम 2 (अ) तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम 2025 आणि न्यायालयीन निर्णयांच्या अनुषंगाने करण्यात येणार आहे.

.      सदर सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांसाठी राखीव जागांचे निर्धारण केले जाणार आहे. या अनुषंगाने पंचायत समिती वरोरा येथील सभागृहात दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली असून, ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी संदीप भास्के यांच्या निरीक्षणाखाली होणार आहे.

.      सदर आरक्षण सोडतीच्या वेळी उपस्थित राहावे, असे प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार वरोरा यांनी सर्व संबंधितांना आवाहन केले आहे.

error: Content is protected !!