Home सामाजिक लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आठवडा संपन्न

लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आठवडा संपन्न

585

वरोरा : लोक शिक्षण संस्थेद्वार संचालित, लोकमान्य महाविद्यालयत राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिनांक 22 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना आठवडा महाविद्यालयात साजरा करण्यात आला व समारोप कार्यक्रम दि. 29 सप्टेंबर 2025 ला पार पडला.

.        या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. दीपक लोणकर यांनी युनोस्कोच्या जागतिक वारसा यदित समावेश करण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या 12 किल्लाचा इतिहास सांगितला. तसेंच स्वराज्याच्या स्थापनेत व विस्तारात गडकिल्ल्यांचे महत्त्व सांगितले. तसेच समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणून प्रा. हिमगौरी देशपांडे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे एकात्म मानवतावादी विचार मांडले. आपल्या संस्कृतीत सण-उत्सव साजरे करताना आपण एकत्र येतो व अहिंसा तत्वाचे पालन करतो. हाच पंडितजीच्या मते मानवतावाद होय. “जो कमायेगा वही खिलायेगा” या पंडितजीच्या तत्वाबाबत बरीच उपयुक्त माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचा आधार घेत त्यांनी सांगितली. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पुरी होते. त्यांनी मन व बुद्धी यांचा एकत्र मेळ कसा घालावा. या अनुषगाने विचार मांडले व सहभागी स्वयंसेकांचे कौतुक केले. या समारोपीय कार्यक्रमाचे मुख्य संचालन विशाखा टाले, स्पर्धाचे संचालन शुभांगी चवले, प्रस्ताविक डॉ. रवींद्र शेंडे तर आभार देवयानी शेंडे यांनी केले.

.       आठवड्याच्या पहिल्या दिवशी (22.09.3025) महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम अधिकारी व सहकार्यक्रम अधिकारी व सबधित प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यात डॉ. जयश्री शास्त्री, डॉ. श्रीनिवास पिलगुलवार, डॉ. तानाजी माने, प्रा. उत्तम देऊळकर, प्रा.लीना पुप्पलवार यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे संचालन  देवयानी शेंडे, प्रस्ताविक डॉ. रवींद्र शेंडे, तर आभार शिवानी पहापळे यांनी मानले. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी (23.09.2025) आजादी हा शॉर्ट म्युझिकल मुव्हीज स्वयंसेवकांना दाखविण्यात आला.

.       आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी(24.09.2025)राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अनिल डोंगरे व प्रा. अनिल नानोटकर होते. कुटुंबाबरोबरच बाहेरील संस्थांची भूमिका संस्कारामध्ये महत्त्वाची आहे. या अनुषंगाने सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रीकांत पुरी, प्रस्ताविक डॉ. रवींद्र शेंडे तर आभार प्रा. रजनिगंधा खिरटकर यांनी मानले.

.      दिनांक 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर मधील विविध कार्यक्रम दिनांक 29 सप्टेंबरला एकत्र घेण्यात आले. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा (विषय-वाढती व्यसनाधीनता एक गंभीर समस्या), देशभक्तीपर प्रेरक गीत स्पर्धा, निबंध स्पर्धा (विषय -छत्रपती शिवाजी महाराज), पोस्टर स्पर्धा(विषय-रक्तदान, अवयव दान, नेत्रदान, शिवाजी महाराजांचे गडकिल्ले) या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या विविध संपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्रध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयंसेवकांचे सहकार्य मिळाले.

error: Content is protected !!