Home चंद्रपुर जिल्हा विशेष आनंदवन चौकात शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

आनंदवन चौकात शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

585

प्रशासनाची धांदल

नितीन मत्ते व किशोर डुकरे यांचे नेतृत्व

वरोरा : ओल्या दुष्काळामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त करीत मंगळवारी वरोरा येथील आनंदवन चौकात जेलभरो आंदोलन छेडले. शासनाने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, यामुळे संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले.

.      हे आंदोलन बाजार समितीचे संचालक नितीन मत्ते व सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात झाले. शेतकऱ्यांनी रस्ता बंद करून सरकार विरोधी घोषणा दिल्या. यावेळी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणेदार अजिंक्य तांबडे व उपविभागीय अधिकारी बकाल यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

  “आम्हाला अटक करा”; शेतकऱ्यांची भूमिका                                                                                                                                      शेतकऱ्यांनी हे जेलभरो आंदोलन असल्याचे सांगत “आम्हाला अटक करा” अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. आंदोलन उग्र होत आनंदवन चौकातून शेतकऱ्यांनी मोर्चा काढत जवळपास तीन किलोमीटर पायी चालत वरोरा पोलीस स्टेशनपर्यंत गेले. मात्र पोलिसांनी आत प्रवेश नाकारल्याने आंदोलकांचा मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळला.

तहसील कार्यालयासमोर ठिय्या                                                                                                                                                         तहसील कार्यालय परिसरात शेतकऱ्यांनी ठिय्या मांडून आंदोलन सुरू ठेवले. बराच वेळ शेतकरी बसून राहिले, तरीही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!