मासिक सभेत केला ठराव पारित
विज वितरण कंपनी विरोधात विज ग्राहकांचा आक्रोश
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत मध्ये तीन हजारांवर वीज ग्राहक आहे. महावितरण कंपनीने जुने विज मिटर बदलून नवीन स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्याचा घाट घातला आहे. यामुळे महावितरण कंपनी विरोधात जनाक्रोश उचंबळून आला आहे. याबाबत ग्रामपंचायत ने मासिक सभेत ठराव पारित करून गावात स्मार्ट प्रिपेड मिटर ला विरोध केला आहे.
. विसापूर गावातील विज ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी विज मिटर लावले आहे. त्यानुसार विज ग्राहक देयकाचा भरणा करत आहे. मात्र महावितरण कंपनी कडून जुने विज मिटर बदलून नवीन स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. जुन्या विज मिटर मध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड न होता, नवीन स्मार्ट प्रिपेड मिटर लावले जात आहे. हा प्रकार कंत्राटदार कंपनीला फायदा देणारा आहे. याला अनुसरून विसापूर येथील उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मासिक सभेत प्रश्न मांडला. या ठरावाला उपस्थित असणाऱ्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शवित एकमताने ठराव पारित करून विसापूर गावातील घरगुती विज ग्राहकांकडे स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्यात येऊ नये, म्हणून वीज वितरण कंपनी चे बल्लारपूर उपविभाग अभियंता यांना निवेदन सादर करण्याचे ठरविण्यात आले. आता विसापूर येथील घरगुती विज ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मिटर चा विरोध आहे. यासंदर्भात निवेदन सादर केले जाणार आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत मध्ये पारित ठराव व विसापूरकरांचा स्मार्ट प्रिपेड मिटर ला विरोध असल्याबाबत निवेदन महावितरण कंपनी चे उपकार्यकारी अभियंता व राज्याचे ऊर्जा मंत्री यांना सादर केले जाणार आहे.
. विसापूर ग्रामपंचायत मासिक सभेला सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, गजानन पाटणकर, सुरज टोमटे, सुनील रोंगे, दिलदार जयकर, सुरेखा ईटनकर, सुवर्णा कुसराम, विद्या देवाळकर, शशीकला जीवने यांची उपस्थिती होती.
” राज्यातील विज ग्राहकांचे जुने मिटर बदलून नवीन स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्यासाठी महावितरण कंपनी ने २१ सप्टेंबर 2023रोजी फर्मान जाहीर केले आहे. त्यानुसार मे. अदानी कंपनीला भांडूप, कल्याण व कोकण विभागात 63, 44, 066, व बारामती आणि पुणे विभागात 52,45,917 ,एनसीसी कंपनीला नाशिक व जळगाव विभागात 28,86,622 आणि लातूर, नांदेड व औरंगाबाद विभागात 27,77,759, मे. मोर्टेकार्लो कंपनीला चंद्रपूर, गोंदिया व नागपूर विभागात 30,30,346, तर जिनस कंपनीला अकोला व अमरावती विभागात 21,76,636 इतके स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्याचे कंत्राट दिले आहे. हा प्रकार राज्यातील विज ग्राहकांचे जुने मिटर बदलून नवीन स्मार्ट प्रिपेड मिटर लावण्याचा प्रकार विज ग्राहकांची आर्थिक कुचंबणा करणारा आहे. यामुळे आम्ही विसापूरकरांनी स्मार्ट प्रिपेड मिटरला विरोध केला आहे. अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच विसापूर, ता.बल्लारपूर जि.चंद्रपूर. “

