Home चंद्रपुर जिल्हा विशेष लोखंडी चॅनल चोरी करणारी टोळी गजाआड

लोखंडी चॅनल चोरी करणारी टोळी गजाआड

569

4 आरोपी अटकेत

16 लाखांचा मुद्देमाल जप्त

पडोली गुन्हे शोध पथकाची कारवाई

चंद्रपूर : एमआयडीसी ताडाळी परिसरातून चोरट्यांनी तब्बल १७ नग लोखंडी चॅनल चोरीला नेल्याप्रकरणी पडोली पोलिसांनी चार आरोपींना गजाआड केले.

.    चोरीसाठी वापरलेला १५ लाखांचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मिळून एकूण १६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पडोली गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.

.    पोलीस सूत्रानुसार फिर्यादी अभिलेप परमेश्वर (४१, रा. घुगूस) यांनी पोलिस स्टेशन पडोली येथे तक्रार दाखल केली होती. २१ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी पाहणी केली असता ५८ चॅनलपैकी १७नग लोखंडी चॅनल चोरीला गेल्याचे दिसून आले. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २६ सप्टेंबर रोजी एमआयडीसी ताडाळी परिसरात चार जण लोखंडी चॅनल विक्रीसंदर्भात चर्चा करत असल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.

.    भारत देवी निषाद (२५), जगदीशकुमार उर्फ गुड्डू ग्यानप्रकाश निषाद (२७), सुनील राकेश निषाद (१९), सुनील अवधेश निषाद (१८) सर्व रा. लखमापूर, चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १७नग लोखंडी चॅनल (किंमत १.८६ लाख) व महिंद्रा ब्लाझो १४ चक्का ट्रक (किंमत १५ लाख) असा एकूण १६.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

.        ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश हिवसे यांच्या नेतृत्वात पो.ह.वा. विनोद वानकर, पो.अं. प्रतीक हेमके, पो.अं. धीरज भोयर, पो.अं. कोमल मोहजे व मपो.अं. सुचिता उमरे यांनी केली.

error: Content is protected !!