भद्रावती : तालुक्यातील नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील नागरिकांना पुलाच्या अभावामुळे प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शासनाचे उंबरठे झिजवून ही न्याय मिळत नसल्याने अखेर नंदोरी गावकऱ्यांनी नंदोरी ते तहसील कार्यालय भद्रावती पर्यंत पदयात्रा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. ही पदयात्रा 18 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता निघणार आहे.
. २०१८ साली चांदा ते बांदा योजने अंतर्गत बंधाऱ्याचे बांधकाम सुरू झाले, मात्र भ्रष्टाचारामुळे ते आजतागायत अपूर्ण राहिले. या पुलाच्या अपुऱ्या बांधकामामुळे इंदिरा नगर वसाहतीतील एका वृद्धाला जीव गमवावा लागला असे असतानाही मायबाप सरकारला पाझर फुटत नाही परिणामी नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असून आता या प्रश्नावर थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून 18 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता नंदोरी ते भद्रावती तहसील कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा निघणार आहे. ही यात्रा तहसील कार्यालयात पोहचताच तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
. या यात्रेमध्ये नंदोरी ग्रामवासी आणि शेतकरी बैल-बंडी, ट्रॅक्टर व ट्रॉलीसह या आंदोलनात सामील होणार आहेत. यावेळी २०१८ साली सुरू झालेले पण अपुरे राहिलेले पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. अश्या मागण्या केल्या जाणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सुरज शाहा व सुमित हस्तक करणार आहे. इंदिरानगर व नदी पड्याळ शेतकऱ्यांच्या मागण्याची पूर्तता १५ दिवसांच्या आत झाली नाही, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा देण्यात आला आहे.


