Home चंद्रपुर जिल्हा विशेष पुरामुळे बळीराजाच्या स्वप्न भंग

पुरामुळे बळीराजाच्या स्वप्न भंग

608

निसर्गाने तोंडातील घास हिरावला

बल्लारपूर तालुक्यात शेतकऱ्यांची दैनावस्था

बल्लारपूर : तालुक्यात यावर्षी वर्धा व इरई नदीच्या पुराने नदी काठावरील शेतकऱ्यांची दैनावस्था केली. तिनदा पुराच्या पाण्याखाली शेत पिक आल्याने नासाडी झाली. यामुळे बळीराजा हवालदिल झाला. तोंडासी आलेला घास निसर्गाने हिरावला. आता पूर ओसरत आहे. मात्र पुरामुळे बल्लारपूर तालुक्यातील बळीराजांचा स्वप्न भंग केल्याची भावना घर करून आहे.

.      बल्लारपूर तालुक्यात कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांनी जीव लावून केला. जमीनीची मशागत करत सोयाबीन, कापूस, भात, तूर, भाजीपाला व अन्य धान्यपिकांची लागवड केली. मात्र, बळीराजाचे हे स्वप्न औट घटकेचे ठरले. पुराने होत्याचे, नव्हते केले. शेकडो हेक्टर मधील पिकांची पुराने नासाडी झाली. परिणामी शेतकरी पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या खचला आहे.

.      बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती, चारवट, नांदगाव (पोडे), विसापूर, बल्लारपूर, बामणी, दहेली, लावारी, कळमना, आमडी, पळसगाव, कोठारी, किन्ही आदी गावातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. सलग तिनदा आलेल्या पुराने बळीराजा घायाळ झाला आहे. ऐन दिवाळीत हाती येणाऱ्या पिकांची नासाडी झाली आहे. शासकीय पातळीवर नुकसानीचे पंचनामे होतील. मदत देण्याची घोषणा होईल. मात्र, शासकीय मदत तुटपुंजी असेल. कर्ज काढून खर्च केला. आशा होती पिकपाणी आल्यावर कर्ज फेडण्याची. मात्र, पुराने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा भंग केला आहे.

error: Content is protected !!