Home राजकीय बल्लारपूरचे देवेंद्र आर्य चंद्रपूर विधानसभा समन्व्यक पदी निवड

बल्लारपूरचे देवेंद्र आर्य चंद्रपूर विधानसभा समन्व्यक पदी निवड

795

चंद्रपुर

.          महाराष्ट्र राज्यात एकूण २८८ विधानसभा मतदार संघापैकी २७ मतदार संघ अनुसूचित जाती साठी आरक्षित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या नुसार चंद्रपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस विचारशरणीच्या मतदारांची मोट बांधण्यासाठी व आगामी निवडणुकीत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा ताबा मिळविण्यासाठी बल्लारपूर येथील नगरपालिकेचे माजी गट नेते देवेंद्र आर्य यांची चंद्रपूर विधानसभा समन्व्यक म्हणून नियुक्ती केली आहे.

.         चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ६ विधानसभा क्षेत्र आहेत.यातील केवळ चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मागील तीन विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला नाही.आता मात्र अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अनुसूचित जाती राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले असून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय सुकर करण्यासाठी राज्यातील २७ अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा क्षेत्रासाठी समन्व्यकांची नुकतीच निवड केली आहे.

.          त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने चंद्रपूर विधानसभा समन्व्यक म्हणून बल्लारपूर येथील काँग्रेसचे माजी न.प.गट नेते देवेंद्र आर्य यांचेवर जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व राजुराचे आमदार सुभाष धोटे,विरोधी पक्ष नेते आमदार विजय वड्डेटीवार,आमदार प्रतिभा धानोरकर,काँग्रेसचे अनुसूचित जातीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोथिया, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, अब्दुल करीम, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, अफसाना सय्यद, प्राणेश अमराज, चेतन गेडाम, सुनंदा आत्राम, मधुकर बावणे, दिलीप माकोडे, डॉ.सुनील कुलदीवार, इस्माईल ढाकवाला,रेखा रामटेके आदींना दिले आहे.

error: Content is protected !!