Home चंद्रपुर जिल्हा विशेष सोयाबीन पिकावर ‘येलो मोझॅक’ रोगाचा कहर

सोयाबीन पिकावर ‘येलो मोझॅक’ रोगाचा कहर

713

तात्काळ पंचनामे करून मदत द्या – सरपंच मंगेश भोयर यांची मागणी

भद्रावती : भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम अत्यंत चिंतेत टाकणारा ठरत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची शेती झाली असली तरी काही दिवसांपासून ‘येलो मोझॅक’ रोगाने या पिकाचा अक्षरशः फडशा पाडला आहे. नंदोरी परिसरातील शेतशिवारात तर या रोगाचा प्रादुर्भाव अधिक गंभीर दिसून येत असून, हातात आलेले सोयाबीन पिक जागच्या जागी पिवळे पडून सुकत असल्याने शेतकऱ्यांच्या हातचे पीक डोळ्यासमोर नष्ट होत आहे.

.       या भीषण परिस्थितीची दखल घेत नंदोरी येथील सरपंच मंगेश भोयर यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांची बैठक घेत झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करुन बाधित शेतकऱ्यांना शासकीय नियमांनुसार तात्काळ मदत जाहीर करावी अश्या मागणीचे निवेदन नंदोरी चे सरपंच भोयर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी उपस्थित नसल्याने सदर निवेदन तहसीलदार वरोरा यांनी स्वीकारले. या निवेदनात “नंदोरीसह भद्रावती तालुक्यातील सोयाबीन पिकांची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत व बाधित शेतकऱ्यांना शासकीय नियमांनुसार मदत जाहीर करावी” अशी मागणी करण्यात आली.

.     यावेळी निवेदन देतांना सरपंच मंगेश भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष आशुतोष घाटे, माजी ग्रा प सदस्य स्वप्नील लांबट, दादाजी झाडे, चेतन तिखट, कैलास ढवस, प्रज्वल एकरे, आकाश मोंढे, सारंग गोंडे, अमोल निखाडे, राजू एकरे, शरद लांबट, हरी एकरे, चेतन विरुटकर, सतीश लांबट, शुभम ठावरी, आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.

“आज सोयाबीन पिकावर आलेले संकट शेतकऱ्यांसाठी मृत्यूदंडासमान आहे. शेतकऱ्यांनी खर्च करून उभी केलेली शेती डोळ्यासमोर सुकत आहे. अशा वेळी शासनाने दुर्लक्ष न करता तातडीने पंचनामे करुन मदतीचे हात पुढे करणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.                                                                                                                                      मंगेश भोयर,                                                             सरपंच, ग्रामपंचायत नंदोरी

error: Content is protected !!