रोज मरे त्याला कोण रडे… पुनर्वसित कुनाडा वासियांचे रडगाणे कायम
वेकोली च्या दुर्लक्षित धोरणाचा पुनर्वसित कुनाडा वासियांना फटका
भद्रावती : सोमवारी दिनांक १ सप्टेंबर रोजी रात्रीला कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भद्रावती तालुक्यासह, पुनर्वसित कुनाडा गाव व शहरातील डोलारा तलाव, पिंडोनी तलाव परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने व घराघरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
. कुनाडा गावाला तर चक्क सरोवराचे रूप प्राप्त झाल्याने घरातील अन्न धान्य, जनावरांचा चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. तसेच देऊरवाडा परिसरातील शिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने परिसरातील शेत पिकांचे नुकसान झाले . यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले.
. वेकोली माजरीच्या प्रचंड मातीचे ढिगारे व भद्रावती नगर परिषदेचे पावसाळ्यापूर्वी केलेले ढिसाळ नियोजन याला जबाबदार असल्याची ओरड नागरिकांना तर्फे करण्यात येत आहे. डोलारा प्रभाग व शिवाजी नगर परिसरात भाजपचे शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी रात्री दीड वाजता मदती करिता धाव घेत संवेदनशीलता दर्शविली. स्थानिक प्रशासना विरोधात प्रचंड असंतोष असल्याची उर्दीघ्न प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत होते.


