Home राजकीय चांदा खंड खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सुभाष रघाताटे पॅनल विजयी

चांदा खंड खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सुभाष रघाताटे पॅनल विजयी

749

मनोहर पाऊणकर पॅनलचा दारूण पराभव

विजयी उमेदवारांचा जल्लोष

बल्लारपुर : चांदा खंड खरेदी विक्री संस्था चंद्रपूर च्या संचालक पदांची निवडणूक रविवारी पार पडली. या निवडणुकीत सुभाष रघाताटे व मनोहर पाऊणकर, दिनेश चोखारे यांचे पॅनल आमने सामने लढतीत होते. मात्र २0२५ ते २030 यावर्षासाठी झालेल्या निवडणुकीत सुभाष रघाताटे पॅनल सर्व १3 संचालक निवडून आले. यामुळे सहकार क्षेत्रातील चांदा खंड खरेदी विक्री संस्थेत पुन्हा एकदा त्यांच्या पॅनलचा दबदबा निर्माण झाला. यामध्ये मनोहर पाऊणकर व दिनेश चोखारे यांच्या पॅनल चा दारूण पराभव झाला आहे. यावेळी विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला.

.       चांदा खंड खरेदी विक्री सहकार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक चंद्रपूर येथील राणी राजकुंवर प्राथमिक शाळा येथे रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४वाजता दरम्यान पार पडली. या निवडणुकीत इतर मागासवर्गीय गटातून सुभाष रघाताटे, अ- वर्ग सहकारी संस्था प्रतिनिधी गटातून योगानंद विठ्ठलराव ताजने, अनुसूचित जाती / जमाती गटातून प्रकाश मुरारी टिपले, महिला राखीव गटातून कल्पना खेमराज नगराळे व वच्छला देवराव ताजने, विशेष मागासवर्गीय गटातून संदीप कवडू उपासे, ब – वर्ग वैयक्तिक प्रतिनिधी गटातून संजय लक्ष्मण गिरीपुंजे, महेशकुमार गौरकार, रितेश भैय्याची पिंपळशेंडे, विठ्ठल बाबुराव पिंपळकर, किशोर नानाजी मत्ते, कपेश सुभाष रघाताटे, विठोबा लक्ष्मण वराटे यांचा दणदणीत विजय झाला.

.      चांदा खंड खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित चंद्रपूर च्या निवडणुकीत सुभाष रघाताटे पॅनलचे वर्चस्व निर्माण झाले आहे. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी त्यांचा अलीकडे पराभव झाला होता. या पराभवाचा वचपा त्यांनी एकहाती सत्ता प्राप्त करून चांदा खंड खरेदी विक्री सहकारी संस्था काबीज करून काढला.

error: Content is protected !!