23 शाळेच्या विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
वरोरा
. शासनाच्या वतीने वरोरा येथील लोकमान्य विद्यालयात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएटर 2023 परीक्षा घेण्यात आली होती .ता 4,5,6,7 ऑक्टोम्बर ला घेण्यात आलेल्या परीक्षेला एलिमेंटरी परीक्षे करीता 806 विद्यार्थी तर इंटरमिजिएट परीक्षेला 327 विद्यार्थी बसले होते.
. या परीक्षेचे गुण दहाविच्या बोर्डात दिले जात असतात .या परीक्षेत A ग्रेट मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना 7 मार्क्स, बी ग्रेड मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना पाच मार्क्स,सी ग्रेट मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना तीन मार्क्स दिले जात असतात .तालुक्यातील 23 शाळांमध्ये लोकमान्य शाळेचे कलाशिक्षक अविनाश कांबळे यांनी शाळांना भेटू देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेचे महत्त्व पटवून दिले.
. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेला बसले केंद्र चालक म्हणून उत्तम जबाबदारी पाळीत परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली. या परीक्षेला पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी चहारे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रफुल खुजे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत पाटील, श्रीकृष्ण घड्याळ पाटील, विश्वनाथ जोशी ब्रम्हदत पांडेय, मंगेश मल्हार , लोकमान्य महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल राखे यांनी परीक्षा केंद्रावर भेट दिली. परीक्षा यशवीते करीता अविनाश कांबळे, प्रल्हाद ठक, जगदीश वाघ, प्रवीण येरमे, जगदीप जुमडे, बावणे धर्मेलवार, मनोहर पारोदे या शिक्षकांनी सहकार्य केले.


